मुंबई, १४ सप्टेंबर २०२३ : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण होय. प्रत्येक वर्षी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. या काळात चाकरमान्यांसाठी रेल्वेची विशेष सोय असते. आता भाजपनेदेखील चाकरमान्यांसाठी विशेष ६ रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दलची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी एक्स वरुन दिली.
महायुतीचे सरकार आले हिंदू सणांवरचे संकट टळले, साथ भाजपची, करु श्री गणेवारी कोकणाची ! असे ट्विट करत नितेश राणे यांनी एक फोटो पोस्टर ट्विट केले आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसतो आहे. त्याखाली नमो एक्स्प्रेस असे टॅग असलेली रेल्वे फोटोत दिसत आहे.
या फोटोवर श्री गणेशवारी कोकणची साथ भाजपची अशी टॅगलाईन लिहिलेली दिसते. गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात सोडण्यात येणाऱ्या सहा रेल्वेचा प्रारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादर रेल्वे स्थानकावर उद्या रात्री पावणे दहा वाजता होणार आहे. असेही त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर