खतांच्या पिशव्यांवर भाजपाची जाहिरात रोहित पवार

5

पुणे, १९ जुलै २०२३ : यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिली. तसेच त्यानंतर काही भागात अतिवृष्टी झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. तसेच देशात खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका बाजूला पावसाने हुलकावणी तर दुसऱ्या बाजूला खतांसह बियाणांच्या वाढलेल्या किंमतींनी शेतकरी अचडणीत सापडला आहे. असे असतानाही सरकार आपल्या जाहिरातबाजीत मग्न आहे. यावरून रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. खतांच्या मुद्द्यावर विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरकारकडून अनपेक्षित उत्तर मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी बोगस बियाणांच्या संदर्भात किती जणांवर कारवाई केली? याबाबतची माहिती सरकारकडे मागितली. तसेच खतांच्या वाढत्या किंमतींच्या मुद्यावरुन देखील सरकारला धारेवर धरलं आहे.

दरम्यान, खतांच्या मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत सरकारला धारेवर धरत असताना खतांच्या पिशव्यांवरून केल्या जाणाऱ्या भाजपाच्या जाहिरातीवरून आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या खतांच्या पिशव्यांवर भाजपाची जाहिरात आहे. असे रोहित पवार म्हणाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात यूरिया खताची पिशवी दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरवाढीचं कारण देत केंद्र सरकार खतांच्या किंमती भरमसाठ वाढवतं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती कमी झाल्यानंतरही देशांतर्गत खतांच्या किंमती मात्र कमी न करता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून नफेखोरी करतंय. आता तर खतांच्या पिशवीवर #भाजप हे नाव छापून शेतकऱ्यांच्या जीवावर फुकटात जाहीरातबाजी सुरु असल्याचा संतापजनक प्रकार सुरु आहे. केंद्र सरकारला चमकोगिरीची फारस हौस असेल तर या जाहीरातीचे पैसे भाजपकडून वसूल करावे लागतील, असा घणाघात रोहित पवारांनी केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा