भाजपचं विजबिलाच्या विरोधात आंदोलन

बारामती, २४ नोव्हेंबर २०२०: काल दि. २३ सोमवारी बारामती शहर व तालुका भाजपच्या वतीनं भिगवण रोडवरील बारामती महावितरण वीज कार्यालयावर महाआघाडी सरकारनं वीजबिल माफ करावं यासाठी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आलं.

याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिवसेना व राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तर नोकरीमध्ये पगारात कपात करण्यात आली तरी देखील महावितरणने नागरिकांना दंड लावून बिल पाठवले आहे.

या बिलांची दंडाची रक्कम जास्त असल्यानं वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी करत ऊर्जा भवनाच्या समोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. वीजबिल माफ केलं नाहीतर पुढौ अजून तीव्र आंदोलन करणार असल्याचे कचरे यांनी सांगितलं.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, भाजप शहराध्यक्ष सतीश फाळके तालुकाध्यक्ष अंजलीताई खजिनदार, सुरेंद्र जेवरे, शहाजी कदम, भारत देवकाते, पिंकीताई मोरे, सारिका लोंढे, संदीप अभंग, नितीन शेळके, बापू फणस आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा