वाघोली, दि. २३ जुलै २०२०: शासनाने गाईच्या दुधाला सरसकट १० रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुठे, तालुका सहकार आघाडी उपाध्यक्ष तथा कोलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य शरद आवळे, तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव, युवा मोर्चाचे विजय जाचक यांनी वाघोलीच्या मंडलाधिकारी किशोर शिंगोटे कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाही तर हे १ ऑगस्टला दूध संकलन बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कुठे यांनी दिला. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकांकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, नकली सोयाबीन करावी लागणारी पेरणी, युरिया खताचा तुटवडा, काळाबाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळात झालेले नुसकान याबाबत शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत प्राप्त झालेली नाही.
संकटांमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संस्थाकडून २० ते २२ रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे.
असे बोलताना गणेश कुठे यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे