गुजरातमध्ये भाजपचा सर्वात मोठा विजय, हिमाचलमध्ये काँग्रेसचं पुनरागमन

पुणे, ९ डिसेंबर २०२२: गुजरात विधानसभेत भाजपनं १८२ पैकी विक्रमी १५६ जागा जिंकल्या आहेत. याआधी काँग्रेसनं १९८५ मध्ये विधानसभेच्या १४९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या, तर आम आदमी पक्षाला केवळ ५ जागा जिंकता आल्या. १२ डिसेंबरला भूपेंद्र पटेल पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

मात्र, मतांच्या टक्केवारीच्या आधारे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालाय. प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील ६% मतं मिळणं आवश्यक आहे. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला १३ टक्के मतं मिळाली आहेत. दिल्ली, पंजाब आणि गोवा या ३ राज्यांमध्ये AAP ने आधीच ६% पेक्षा जास्त मत मिळवले आहे.

हिमाचल प्रदेशातील प्रत्येक निवडणुकीप्रमाणं यावेळीही सत्तापरिवर्तन झालंय. राज्यातील विधानसभेच्या ६८ पैकी ४० जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. तर भाजपनं २५ जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाला आपलं खातंही उघडता आलं नाही. याशिवाय मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या यूपीमधील मैनपुरी लोकसभा मतदारसंघात डिंपल यादव यांनी २.८८ लाख मतांनी विजय मिळवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा