भोकरदन, जालना २५ फेब्रुवारी २०२४ : भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी काल बुथ प्रमुखांशी चर्चा केली. भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी बुथ सशक्तिकरण अभियान कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, जि.प.सदस्य गणेश बापू फुके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जवखेडा खुर्द येथिल स्वातंत्र्यसेनानी कै.दादाराव पाटील दानवे सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यशाळेत, भोकरदन तालुक्यातील पण बदनापूर विधानसभेत असलेल्या ६५ गावांचे सर्व बुथप्रमुख व गावातील प्रत्येक बुथवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बुथनिहाय मतदार यादीचा आढावा यावेळी श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी स्वतः घेतला. बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या बुथवरील अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या समस्येचे निराकरण करीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याविषयी रचना तयार करुन दिली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने सबका साथ, सबका विकास या तत्वावर कार्य करत जनतेकडून सबका विश्वास मिळवला आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवरील शेवटच्या घटकापर्यंत केंद्रसरकारच्या व राज्यसरकारच्या योजना आपण पोहचवल्या आहेत का त्याचा देखिल आढावा यावेळी मंत्री श्री दानवे यांनी घेतला.
न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे