दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय

10

दिल्ली ८ फेब्रुवारी २०२५: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपने ७० पैकी ४५ जागांवर आघाडी घेतली आहे, तर आम आदमी पक्ष २५ जागांवर पुढे आहे.

नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल आणि पर्वेश सिंग यांच्यातील चुरशीच्या लढतीत पर्वेश सिंग आघाडीवर आहेत.

एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपला बहुमत मिळणार असल्याचे सूचित केले होते, आणि निकालांनी हे भाकीत खरे ठरवले आहे.

या विजयामुळे भाजप २७ वर्षांनंतर दिल्लीत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. आता सर्वांचे लक्ष भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराकडे लागले आहे.
दिल्लीतील या सत्तांतरामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आगामी काळात भाजपच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर सर्वांचे लक्ष असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा