दिल्लीच्या रणसंग्रामात रंगत! कुठे पिछाडी, कुठे आघाडी?

12

दिल्ली ८ फेब्रुवारी २०२५: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी वेग घेत असून, प्राथमिक कलांनुसार काही ठिकाणी चुरशीची लढत दिसून येत आहे, तर काही ठिकाणी स्पष्ट आघाडीचे संकेत मिळत आहेत. मतमोजणीच्या प्रारंभिक टप्प्यात नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर सुरू असून, केजरीवाल कधी आघाडीवर, तर कधी पिछाडीवर जात आहेत.

कालकाजी मतदारसंघात भाजपचे रमेश बिधुडी आघाडीवर असून, आतिशी दुसऱ्या स्थानी आहेत. अल्का लांबा तिसऱ्या स्थानी असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जंगपूरा मतदारसंघातही भाजपचे तरविंदर सिंह मारवाह आघाडीवर असून, आपचे मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत. बाबरपूरमध्ये गोपाल राय मजबूत आघाडीवर असल्याने आम आदमी पक्षासाठी दिलासा आहे.

पटपडगंजमध्ये भाजपचे रविंदर सिंह नेगी 7 हजार मतांनी आघाडीवर असून, करावल नगरमध्ये कपिल मिश्रा तब्बल 13,500 मतांनी पुढे आहेत. मुस्तफाबादमध्ये भाजपच्या मोहन सिंह बिष्ट यांनी 21 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

दिल्लीच्या रणधुमाळीत अंतिम निकाल कोणाच्या पारड्यात झुकणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा