गोल पोस्ट महाराष्ट्र फलटण येथे भाजपचे महाविजय २०२४ संपर्क अभियान, माढा लोकसभा मतदार संघाचा आढावा

फलटण येथे भाजपचे महाविजय २०२४ संपर्क अभियान, माढा लोकसभा मतदार संघाचा आढावा

फलटण, सातारा २६ डिसेंबर २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य माणसाच्या आयुष्या साठी केलेलं कार्य हे अविस्मरणीय असून विविध योजनां मधून या देशातील सर्वसामान्य जनतेच हित जोपासत, आत्मनिर्भर भारत बनवण्याच कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फलटण येथील संपर्क अभियानात व्यक्त केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. ते फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविजय २०२४ संपर्क अभियाना अंतर्गत, माढा लोकसभा मतदार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, पुण्याचे माजी महपौर मुरलीधर मोहोळ, सातारा जिल्हाध्यक्ष धर्यशिल कदम यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

error: Content is protected !!
Exit mobile version