भाजपची नवी रणनिती सुरु …लोकसभा प्रवास फेज २

पुणे, १९ ऑक्टोबर २०२२ : भाजप आता पूर्ण तयारीनिशी रणांगणात उतरणार आहे. त्यासाठी भाजपने २०२४ साठी नवीन रणनीती आखली आहे. ज्या जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, त्या जागांसाठी भाजपने आता नवी योजना आखायला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत भाजपला १४४ जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सर्व जागांवर आता भाजप काम करणार असून त्या सर्व ठिकाणी भाजप मेळावे घेणार आहे. या ठिकाणी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मेळावे घेऊन तिथल्या पराभवाची कारणे जाणून घेणार आहेत. याचबरोबर पश्चिम बंगाल, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांवर भाजप विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे.

काही ठिकाणी भाजप नंबर दोन किंवा तीनवर आहे. अशा ठिकाणी या पराभवाची कारणे शोधून त्या मतदार संघातून जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. यासाठी या रणनितीला लोकसभा प्रवास फेज २ असे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदार संघ, तर उत्तरप्रदेशात रायबरेली या सोनिया गांधी यांच्या मतदार संघावर भाजप विशेष मेहनत घेणार आहे. त्यामुळे आता या जागांसाठी भाजप नक्कीच उत्सुक आहे. याचबरोबर इतर ४० जागांसाठी भाजप आग्रही असून तेथील मंत्र्यावर विशेष जबाबदारी आहे. त्यांना प्रभारी म्हणून काम करावे लागणार आहे. त्यामुळे भाजप एकुणातच २०२४ च्या निवडणुकीच्या कामाला लागली आहे. असं म्हणावे लागेल. पण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर विशेष जबाबदारी आहे, असंच म्हणावे लागेल. त्यांच्या भाषणाचा परिणाम काय होईल, हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा