बिहारमध्ये नितीशकुमार यांना धक्का देण्यासाठी भाजपचे नवे तंत्र….

नवी दिल्ली, २८ एप्रिल २०२३: देशातील तमाम विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मोहिमेत व्यग्र असलेले नेते नितीश कुमार यांना त्यांच्याच कर्मभूमीत म्हणजे बिहारमध्ये धोबीपछाड देण्यासाठी भाजपने नव्या राजकीय समीकरणावर काम चालू केले आहे. संयुक्त जदमधील नाराज नेत्यांना आपलेसे करून घेण्याबरोबरच सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या मतपेटीला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

सोशल इंजिनिअरिंगचा भाजपचा प्रयत्न उत्तर प्रदेशात चांगलाच यशस्वी झाला होता. त्या धर्तीवर आता बिहारमध्ये लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी असा प्रयोग राबविला जात आहे. पारंपरिक मतदारांना आपल्यासोबत ठेवतानाच नितीश कुमार यांना सातत्याने पाठिंबा देणाऱ्या मागास समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

बिहारमध्ये यादव समाजापाठोपाठ सर्वाधिक प्राबल्य आहे ते कुशवाह समाजाचे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या समाजाची संख्या आठ टक्क्यांच्या आसपास आहे. अलीकडेच भाजपने कूशवाह समाजांचे नेते सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष बनविले होते. कूशवाह समाजाने सदैव नितीश कुमार यांना पाठींबा दिलेला आहे. पण नितीश कुमार यांनी या समाजाला सदैव धोका दिला असल्याचा प्रचार भाजपकडून केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा