राज्यात पुन्हा एकदा भाजपचे ऑपरेशन लोट्स?

10

मुंबई, ८ डिसेंबर २०२२ : राज्यातील विधानपरिषदेच्या सभापतिपदावर भाजपचा डोळा आहे. विधानसभेचे सभापतिपद आपल्याला मिळावे, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यामुळे सभापतिपदासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपचे ऑपरेशन लोट्स होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सभापतिपदासाठी निवडणूक लागल्यास राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, येत्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सभापतिपदाचा फैसला होणार आहे. सभापतिपदासाठी निवडणूक लागल्यास राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे. सभापतिपदासाठी भाजपकडून राम शिदे यांचे नाव चर्चेत आहे.

सध्या विधानपरिषदेचे उपसभापतिपद हे उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतिपद आपल्याकडे यावे, यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी राष्ट्रवादीची मदतही भाजप घेऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ७८ पैकी २१ जागा रिक्त आहेत. सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके आहे. भाजपकडे २२ सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मते लागतील. राज्यपाल नियुक्त १२ आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ९ अशा एकूण २१ जागा सध्या रिक्त आहेत. या जागा भरल्यास भाजपला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा