बिहार निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, ४६ उमेदवारांची नावं निश्चित

बिहार, १२ ऑक्टोंबर २०२०: भारतीय जनता पक्षानं रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसर्‍या यादीमध्ये ४६ उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. बिहार निवडणुकीसाठी भाजपनं आतापर्यंत ७७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीमध्ये २७ आणि दुसर्‍या यादीत २ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.

शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली. या महत्त्वपूर्ण बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली.

दरम्यान, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी सिमरी बख्तियारपूर येथून निवडणूक लढवणार आहेत.

रविवारी भाजपनं जाहीर केलेली तिसरी यादी दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांविषयी आहे. या ४६ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या तिसर्‍या यादीमध्ये बेटियाह येथील रेणू देवी, बैकुंठपूरमधून मिथिलेश तिवारी आणि दानापूर मतदारसंघातून आशा सिन्हा यांना तिकीट देण्यात आले आहे.

श्रेयसी सिंह यांना टिकीट

तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षानं ६ ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नुकत्याच भाजपमध्ये रुजू झालेल्या श्रेयसी सिंग यांनाही तिकीट देण्यात आलं. पक्षानं त्यांना जमुई येथील उमेदवार केलं आहे. श्रेयसी सिंह बिहारच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे.

दुसर्‍या टप्प्यात ९४ जागांवर निवडणूक

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर दुसर्‍या टप्प्यातील ९४ जागांवर निवडणुका होणार आहेत. शुक्रवारपासून या जागांसाठी नामनिर्देशन सुरू झालं आहे. १६ ऑक्टोबर रोजी उमेदवारीची अंतिम तारीख आहे. दुसर्‍या टप्प्यातील जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

एनडीएमध्ये जनता दल युनायटेडला (जेडीयू) १२२ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाकडं १२१ जागा आहेत. यापैकी जेडीयू’नं आपल्या पक्षाला आपल्या खात्यासह ७ जागा दिल्या आहेत, तर आता भाजपानं व्हीआयपी’ला ११ जागा दिल्या आहेत. २०१५ वगळता भाजप आणि जेडीयू’नं गेल्या दीड दशकात एकत्र निवडणुका लढवल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा