मुंबई, ९ ऑगस्ट २०२२: प्रामुख्याने साखर कारखानदार, रियल इंडस्ट्रीशी निगडित, बॅंका चालवणारे, उद्योगपती आणि काही प्रेमाच्या जाळ्यात अडकलेले किंवा अडकवलेले(हनी ट्रॅप) भाजप मधील सोडून सर्वपक्षीय नेते, यांना विविध चौकशांच्या माध्यमातून जेरीस आणून त्यांना आपल्या गळाला लावण्याचे एक परफेक्ट सूत्र भाजप ला अवगत झाले आहे.
नारायण राणे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर,कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, मधुकर पिचड, विजयकुमार गावित, विजयकुमार मोहिते पाटील, संजय राठोड या नेत्यांसोबतच राज्य आणि देशपातळीवरचे अनेक नेते ज्यांच्यासोबत युती करण्या आधी अथवा त्यांच्या भाजप प्रवेशा आधी, भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले,त्यांच्याविरुद्ध कोर्टात गेले. त्यात काही जण तर तुरूंगात जाऊन आले. पण नंतर तेच लोक भाजप सोबत गेल्यावर त्यांच्यावरचे आरोप थांबले, चौकशा शिथिल झाल्या, पुरावे बाहेर आलेच नाहीत. म्हणजेच हेच नेते भाजपच्या धुलाई मशिनीतून क्लीन होऊन आज मंत्री पदाच्या शपथा घेत आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी सांगितले की, ज्या नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि आयकर विभाग कारवाई करतात ते लोक भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाल्यानंतर किंवा त्यांच्याशी युती केल्यास ते स्वच्छ होतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे