बी के बी एन रस्ता झाला जीवघेणा…

इंदापूर, दि. ३ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील बी. के.बि.एन. रस्ता हा जीवघेणा झाला असून गंभीर अवस्थेतील रस्त्याला कोरणा झाल्याची चर्चा आहे. याच्या लसीकरणाचा शोध अद्यापही लागला नसुन लोकप्रतिनिधी विरोधी पक्षनेत्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देणे ऐवजी सुमारे ४० किलोमीटर रस्ता पूर्ण खोदून मुरमीकरण करावे. पुढच्या पंचवीस वर्षांनंतर डांबरीकरण करावी अशी खोचक मागणी सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावर उपचार करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तथाकथित तज्ञ हतबल झाले असून त्यावर उपचार करणे आमच्या हातातच नाही असे म्हणू लागले आहे. तर कोरोना परवडला पण या रस्त्यावर नको रे बाबा ! असे नियमित प्रवास करणारे प्रवाशी म्हणू लागले आहेत.

बी. के. बी. एन. म्हणजे बारामती – कळंब – बावडा ते नरसिंगपूर असा ४० किलोमीटरचा रस्ता यापूर्वी अनेक वेळा डागडुजी केली पण रस्त्याचे काम गेली पंधरा वर्षात एकदाही पुर्ण काम झाले नाही. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कळंब, निमसाखर, निरवांगी, रेडणी, बावडा या भागातील अनेक मंडळे, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी यापुर्वी आंदोलने केली निवेदने दिली, उपोषणे केली सगळे करून झाले, पण हा रस्ता आमच्या अखत्यारित येत नाही अशा संबंधित खात्याकडून एकमेकांवर टोलवा टोलवी करतात.

अर्थात जबाबदारी घ्यायला संबंधीत प्रशासन तयार नाही. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते म्हणाले कि खड्ड्यातुन रस्ता की रस्त्यातुन खड्डे असा प्रश्न पडत आहे. जर खड्डे मोजण्यासाठी सुरुवात केल्यास पुढील खड्डे मोजत असताना मागे किमान पंचवीस खड्डे पडत असतात. पालखी काळात पालखी मार्ग दुरुस्ती अशासाठी काही निधी येतो व त्यातून खड्डे बुजवले जातात पण चालू वर्षी या रस्त्यावरून पालखीत जाणार नसल्यामुळेच निधीची तरतूद झाली नाही व खड्डे ही बुजवले नाही अशी चर्चा आहे. यामुळे बारामती – बावडा रस्ता होतो कि स्वप्नच राहते याकडे या भागातील नागरीकांमधुन प्रतिक्रिया येत आहे.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार अतुल तेरखेडकर याबाबत म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बी के बी एन लगतच्या मतदारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना अपेक्षेप्रमाणे मतदान न दिल्यामुळे लोकप्रतिनिधींचे अर्थात विद्यमान मंत्री महोदय दत्तात्रय भरणे यांचे रस्ता दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप तेरखेडकर यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा