जयपूर, १६ सप्टेंबर,२०२० : भारतातील मल्टिनॅशनल ग्रुप आणि ऑफ – हायवे टायर मार्केट कंपनी बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बिकेटी टायर्स) यांनी यंदा होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स या संघाला स्पॉन्सर केलं आहे. राजस्थान रॉयल्स या संघाने आयपीएल सुरू झाली होती तेव्हा पहिल्याच आयपीएल सीजन मध्ये विजेतेपद मिळविले होते. तसेच यंदा कोरोनाचे सावट जगभर असल्यामुळे आयपीएल स्पर्धा उशिरा सुरू होत आहेत.आयपीएल पुढे ढकलल्या नंतर नवीन तारखेनुसार १९ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार आहे.
याच कंपनीने विवो प्रो कबड्डी लीग २०१९ च्या सीजन मध्ये एकूण १२ संघांपैकी ८ संघांना स्पॉन्सर केले होते. त्यात पटना पायरेट्स, पुणेरी पलटण ,तमिल थलाइवाज, यु मुंबा ,गुजरात फॉर्च्यून जायंट्स, युपी योद्धा, दबंग दिल्ली आणि हरियाणा स्टीलर्स या कबड्डी संघांचा समावेश होता.
बिकेटी टायर्स चे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ,राजीव पोद्दार म्हणाले,” भारतात सर्वजण क्रिकेटवर प्रेम करतात,आणि बिकेटी काही वेगळे नाही आहे”. तसेच चांदणी मल्होत्रा ,( जनरल मॅनेजर पार्टनरशिप राजस्थान रॉयल्स) म्हणाल्या ,” या दोन्ही ब्रँड्स ची व्ह्यालू एकसारखीच आहे. आणि आम्ही संयुक्त असल्यामुळे खूपच उत्साहित आहोत.तसेच आम्ही नवीन नवीन गोष्टींच्या मदतीने आणि ग्राहकांच्या सोबतीने नवीन योजना बनवत आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे