निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

नाशिक, २५ जुलै २०२३ : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे एक वाजायच्या सुमारास, निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात छापा मारुन काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा २० लाख रुपये किंमतीचा युरिया खताचा मोठा साठा ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरवस फाटा नांदगाव रस्त्यावरील एका वस्तीवर, केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना शिक्का असलेल्या २० लाख रुपयांच्या ४०० ते ५०० गोण्या मधील युरिया खत, दुसऱ्या खाजगी गोण्या मध्ये भरुन ट्रक द्वारे मुंबईला घेऊन जात असताना निफाडला पोलिसांनी पकडला.

एका संशयीतासह सदर ट्रक चा चालक व वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांना मुबलक युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी २८० रुपयांना मिळते. कृषी खत विक्रेते दुकानदार युरिया तस्करांना ही गोणी २००० हजार रुपये दराने विकतात. युरिया तस्कर, ही गोणी मुंबईत अवैध व्यवसाय करणाऱ्या कंपनीला ५००० रुपये प्रमाणे विक्री करतात अशी मिळत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा