गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड, साठ लाखांचा मुद्देमाल जप्त

कामती, सोलापूर ११ जुलै २०२३ : एलपीजी गॅसने भरलेल्या टॅन्करमधून, धोकादायकरित्या गॅस सिलिंडरमध्ये भरला जात होता. हा गॅस काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीचा कामती पोलिसांकडून पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून एकूण ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कामती पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी ही कारवाई केली आहे. दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील सोहाळे हद्दीतील हॉटेल शिवराज पॅलेसच्या पाठीमागील जागेत, काही लोक बेकायदेशीर गॅस भरत असल्याची माहिती समजली. घटनेची गंभीरता समजून सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे, पोलीस भरत चौधरी, अमोल नायकोडे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी टँकरमधून गॅस काढला जात होता. तेथून दोघाजणांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी गॅस टँकर, टुलकीट, गॅस सिलिंडरच्या रिकाम्या आणि काही भरलेल्या टाक्या, त्याचबरोबर काळ्या बाजारात सदर गॅसच्या टाक्या विक्रीसाठी नेण्यासाठीचे चारचाकी वाहन, असा एकूण ६० लाखांचा मुद्देमाल कामती पोलिसांनी जप्त केला. या कारवाईबद्दल सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे आणि टीमचे अभिनंदन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा