वॉशिंग्टन, २९ ऑगस्ट २०२०: मार्वल चित्रपटांमध्ये ब्लॅक पँथरची भूमिका साकारणारा अभिनेता चेडविक बॉसमन याचे कर्करोगाने निधन झाले. चेडविक बॉसमनच्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करुन त्याच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुःख व्यक्त करत त्याच्या परिवाराने लिहिले की, “२०१६ मध्ये, चेडविक बॉसमनला स्टेज ३ च्या कोलन कर्करोगाचे निदान झाले होते, आणि तो गेल्या चार वर्षांपासून या आजाराशी लढत होता, त्यादरम्यान हा आजार अखेर चौथ्या टप्प्यामध्ये पोचला.”
चाडविकच्या कुटुंबीयांनी लिहिले, “एक खरा योद्धा, जो या सर्व परिस्थितीशी लढत राहिला आणि या दरम्यान त्याने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं. त्याच्या या कामावर आपण सर्वांनी खूप प्रेम देखील केलं. ज्यामध्ये मार्शलपासून ते डा ५ ब्लड आणि ऑगस्ट विल्सनच्या मा रैनीच्या ब्लॅक बॉटम आणि बरेच काही असे त्याचे चित्रपट होते. हे सर्व चित्रपट त्याने अंतहीन शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी दरम्यान केले. “
“किंग टी’ छला यांना ब्लॅक पँथर म्हणून जिवंत ठेवणे त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. त्याच्या मृत्यूसमयी त्याची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य होते. आम्ही आपल्या प्रेम व प्रार्थनेबद्दल आभारी आहोत आणि आशा आहे की या दु:खाच्या वेळी आपण आमच्या सोबत असाल ” असे चडविकच्या कुटूंबाने ट्विट केले. त्यांनी केलेल्या ट्विट वर त्याच्या चाहत्यांनी अनेक रिट्विट व प्रतिक्रिया दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी