पुणे: देशातील कोरोना विषाणूबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्या पार्श्वभूमीवर गंभीर उपाय योजण्यास केंद्र आणि राज्य सरकारने सुरुवात केली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्रीपासून राज्याती सर्व ऑफिस, दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केवळ जीवनावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात बंद पाळण्यात येत आहे. पुण्यातल्या या बंदमुळे ब्लड बँकांमधला रक्ताचा साठा कमी झाला आहे. एका ठिकाणी १५ पेक्षा जास्त लोक येणार नाहीत, अशा पद्धतीने रक्तदान घडवून आणावे, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ब्लड बँकांना दिली आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. आहात तिथेच पुढील काही दिवस राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोटींच्या सुरक्षेखातिर गर्दीचे ठिकाणे लोक टाळत आहे. याचा मोठा परिणाम सर्वजणी लोक हिताच्या कार्यवाही होत आहे. मोठ्या संख्येने होणारे रक्त दान शिबिरे कमी होत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.
करोना विषाणूचे देशावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत भारताच्या तमाम जनतेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजेच संचारबंदी पाळून देश कोरोना विषाणूमुक्त होण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे.