रक्तदान सर्वश्रेष्ठ दान: प्रविण माने

बारामती, दि.७ जून २०२०: मानवाला अत्यावश्यक असणारी प्रत्येक गोष्ट तयार करता येते, ती विविध कंपनीमध्ये कारखान्यामध्ये बनवता येते. परंतु मानवाला आवश्यक असणारे रक्त हे कोणत्याही कंपनीमध्ये तयार होत नाही ते बनवता देखील येत नाही. रक्ताशिवाय माणूस जगू शकत नाही. यासाठी प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे तसेच राज्यात जाणवत असणारा रक्ताचा तुटवडा इंदापूर मधूनच भरून काढू ,असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रविण माने यांनी केले.

कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाने थैमाण घातले असून राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभुमीवर प्रविण माने युवा मंचच्या वतीने इंदापूर तालुक्यातील गावागावात रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. यामध्ये बेलवाडी (ता.इंदापूर) येथील जि.प.शाळेत आज रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी माने बोलत होते. यावेळी शिबीराचे उद्घाटन छत्रपती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार यांनी केले.

यावेळी बेलवाडीचे सरपंच माणिक जामदार,उपसरपंच नानासो पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेश जामदार, बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर, थोरातवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा उद्योजक हनुमंत जाधव, विजय निंबाळकर,विशाल मुळीक आदी उपस्थीत होते.

या रक्तदान शिबीरात २११ बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.यावेळी सर्व रक्तदात्यांना मास्क, सैनिटायझर व २० लिटर पाण्याचे जार देण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा