पुणे, दि. ४ मे २०२० : राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी भीतीपोटी रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. राज्यात रक्त साठ्यात तुटवडा भासण्याचे संकट उभे राहिल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत, ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. संकटाच्या काळातील ही सामाजिक जबाबदारी जपत औंध येथे काही सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान सोमवार दिनांक ४ मे रोजी औंध येथील सिझन्स हॉटेलच्या जवळ असलेल्या ‘विद्यांचल हायस्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर कु अक्षय संजय मुरकुटे युथ फौंडेशन, शिवबा ग्रुप, शंभुराजे ग्रुप, सागर शाही युवा मंच, सतेज मित्र मंडळ, स्वराज्य युवा प्रतिष्ठान इत्यादी सामाजिक संघटनांकडून आयोजित केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी