गोल पोस्ट इतर दिनविशेष स्वाभिमानी युवा मंचच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

स्वाभिमानी युवा मंचच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

माढा, ११ नोव्हेंबर २०२०: स्वाभिमानी युवा मंचाच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कुर्डूवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तब्बल १०१ रक्तदात्यानी रक्तदानात सहभाग नोंदवला. सद्यस्थिती मध्ये कोरोनाच्या आजारामुळे रक्ताची गरज वाढल्याने स्वाभिमानी युवामंचाने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन लक्ष्मण पाटील, शशिकांत नरुटे, अभिजित सोलंकर, शिवराज पुकळे, महेश पाटणे, नंदकुमार गावडे, भैय्या तरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. सांगोला येथील रेवनील रक्तपेढीने रक्त संकलन केले.

यावेळी सत्यवान हांडे, संस्थापक शुभम तोडकर, जिगर ग्रुपचे औदुंबर लेंगरे, मयुर वाघमोडे, रोहित सरक, धनाजी दोलतोडे, विजय वाघमोडे, ओंकार कोयले, किरण वाघमोडे, रुशी गरड, सुरज लिंगे, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version