आव्हाळवाडी, दि. ५ जुलै २०२०: येथे आज दि. ५ जुलै २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर रोगामध्ये सध्या रक्ताचा भीषण तुटवडा जाणवत आहे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनी देखील वारंवार आपल्याला रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील जनतेला रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आव्हान केले आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक हित जपत हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी गावात आज आव्हाळवाडी संत निरंकारी मंडळ आव्हाळवाडी यांच्या वतीने आज जवळपास १०० रक्तपिशव्या संकलित झाल्या.
या संकलित झालेल्या रक्तपिशव्या आपण राज्य सरकारला सुपूर्द करणार असल्याचे संत निरंकारी मंडळ आव्हाळवाडी यांच्यावतीने बोलताना सांगितले. स्वच्छेने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना “महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण” परिषदेतर्फ प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन आवळवाडी गावच्या सरपंच ललिता आव्हाळे, ग्रामस्थ यांनी केले. यावेळी कार्यक्रमास आव्हाळवाडी गावच्या पोलीस पाटील वृषाली आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, मा. उपसरपंच देवा आव्हाळे, कृषी गटाचे अध्यक्ष दिगंबर आव्हाळे, कृषी गटाचे सचिव दत्तात्रय आव्हाळे, प्रगत शील शेतकरी उमेश आव्हाळे, उद्योगपती चंद्रकांत आव्हाळे, संत निरंकारी मंडळाचे आव्हाळवाडी प्रमुख दत्तात्रय सातव, काळुराम हरपळे, चंद्रकांत सातव, दादासाहेब खांदवे, मनोज आव्हाळे, आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे