पुण्यात सीकेपी पब्लिक ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे, १४ सप्टेंबर २०२०: पुण्यातील सीकेपी पब्लिक ट्रस्ट आणि श्रीमंत सरदार सखाराम घरी गुप्ते चां का प्रभू कार्यालय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन आज पुण्यात  करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पुण्यात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहयोगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आलेले आहे. नारायण पेठमध्ये असलेल्या गुप्ते मंगल कार्यालयात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी सीकेपी पब्लिक ट्रस्ट आणि श्रीमंत सरदार सखाराम हरी गुप्ते चां.का. ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाच्या संकट काळात आणि अत्यंत गरजेच्या वेळी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे