फलकांमुळे होणारे जळगाव शहराचे विद्रुपीकरण थांबणार, महापालिकेने केल्या ५० जागा निश्चित

जळगाव ९ डिसेंबर २०२३ : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागासह कोठेही लावण्यात येणाऱ्या विविध आकारातील फलकांमुळे शहर विद्रूप होण्यासह अपघात होत होते. वाऱ्यामुळे किंवा वाहनांच्या धक्क्यांमुळेही फलके रस्त्यावर कोसळत होती. शहरात कोठेही फलक लावण्यात येत होते. रस्ता दुभाजक, वीजेचे पोल, शासकीय किंवा खासगी मालमत्ता यांच्या भिंतीवर हे फलक लावले जायचे. यामुळे शहर विद्रुप दिसत होते. या सर्वांवर आता महापालिकने उपाययोजना केली आहे. त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात ५० जागा निश्चित केल्या आहेत. त्याच ठिकाणी हे जाहिरात फलक लावण्यात येतील.

होर्डिंग्स बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने आता शहरात फलक लावण्यासाठी पन्नास जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर दहा बाय दहा ही साईजही ठरवून दिली आहे. त्याच ठिकाणी आता हे फलक लावण्यात येतील. या निश्चित केलेल्या जागेशिवाय इतरत्र फलक लावल्यास महापालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पथकातर्फे शहरातील पन्नास जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव शहरात निश्चित केलेल्या जागांची यादी-
डॉ. हेडगेवार चौक, स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ, स्वतंत्र चौक, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्याजवळ, आचार्य तुलसी मार्ग, आकाशवाणी केंद्राच्या डाव्या बाजूला, काव्य रत्नावली चौक, युवा शक्ती वाचनालयाजवळ, सागर पार्क, मैदानाच्या गेटजवळ डाव्या बाजूला, बॅरिस्टर निकम चौक, हॉटेल सुलक्षाजवळ, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मैदानाजवळ, केसीई सोसायटीच्या उजव्या बाजूला, महेश चौक, बुक बॉन्ड कॉलनी, महेश चौक बहिणाबाई उद्यानाजवळ, पोलिस हेडक्वॉर्टर मशिदजवळ, मुलींचे निरीक्षणगृह व शिशुगृह गेटसमोर, ख्वाँजामियाँ रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या बाजूला, कमलाबाई खटोड पाणपोईजवळ, गणेश कॉलनी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर रिक्षा स्टॉपजवळ, शहीद भगतसिंग रिक्षा स्टॉपजवळ, चौबे शाळा चौक, शनीपेठ, गणपती प्लाझा, सत्यम प्लाझासमोर, जिल्हा परिषद कॉम्पलेक्सच्या डाव्या कोपऱ्याजवळ, बेंडाळे चौक, नेरी नाका चौक, जुन्या पाझंरापोळ भिंतीला लागून, चौधरी पेट्रोलपंपाच्या समोर, रस्त्याच्या बाजूला. बस डेपोच्या डाव्या कोपऱ्याला भिंतीला लागून वासुकमलसमोर, अजिंठा चौफुली, अजिंठा बॅकवर्ड सोसायटीच्या गेटजवळ उजव्या कोपऱ्याला, गुरू रामदाजी रेस्टॉरंटसमोर, अजिंठा चौफुली, महेंद्राच्या डाव्या बाजूला महिंद्र पान सेंटर, पांडे डेअरी चौक पोस्ट ऑफिसच्या उजव्या कोपऱ्याला, सिंधी कॉलनी रोड, अंध मुलींच्या वस्तीजवळ, इच्छादेवी चौक, नवीन पोलिस ठाण्याजवळ, पश्चिमेस खुल्या जागेजवळ, छत्रपती शिवाजीनगर पुलाखाली. जे. के. जिनिंगच्या डाव्या बाजूस, इंद्रप्रस्थनगर रिक्षा स्टॉपसमोर भिंतीला लागून दूध फेडरेशन रोड, सावरिया कन्झ्युमर्सजवळ डाव्या कोपऱ्याला, सुरत रेल्वे गेटजवळ साईबाबा मंदिराजवळ, दूध फेडरेशनसमोर, म्हाडा सोसायटीसमोर, मुक्ताई कॉलनी परिसर खुल्या जागेस लागून, निमखेडी रस्ता उत्तुंग बंगल्याच्या उजव्या बाजूला रस्त्यालगत, चंदू अण्णानगर चौकात रिक्षा स्टॉपजवळ, खोटेनगर रिक्षा स्टॉपजवळ, गुजराल पेट्रोलपंपाच्या कोपऱ्यावर, मानराज मेगा मार्टससमोर महामार्गाच्या बाजूला, पिंप्राळा रोड ब्रीजजवळ भिंतीला लागून, बजरंग बोगद्याजवळ हॉस्पिटलसमोर, आयएमआर कॉलेजसमोर मुलींच्या वसतिगृहाच्या भिंतीला लागून, यशवंत कॉलनी, बाहेती कॉलेजसमोर, गणेश कॉलनी ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर, नूतन मराठा कॉलेजच्या भिंतीला लागून, पांडे डेअरी चौक, जळगाव इंग्लिश मीडियम स्कूलजवळ रत्याच्या कडेला, छत्रपती शंभूराजे चौक, मोहननगर, लीलावती जैन अपार्टमेंटसमोर, महाबळ स्टॉप जाणता राजा चौकाजवळ, डी-मार्टजवळ, जुना शिरसोली नाका चौकाजवळ, गिरणा टाकीमागे, रामानंदनगर रोड, एकलव्य क्रीडा मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला, शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआय गेटच्या उजव्या बाजूला, शिवकॉलनी स्टॉप, रिक्षा स्टॉपच्या पुढे, गणेश कॉलनी रोड, दि जळगाव पीपल्स बँकेजवळ, शेरा चौक, शेरा टॉवरजवळ मास्टर कॉलनी, नागोरी चौक मास्टर कॉलनी, अशोक किराणाजवळ, मेहरूण.

यासोबतच सतरा मजलीसमोर, प्रकाश मेडिकल चौक, सुभाष चौक, घाणेकर चौक या ठिकाणांसह कोणत्याही रस्ता दुभाजकावर यापुढे फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांची कडक अंमलबजावणी झाल्यास जळगावकरांची होर्डिंग्सच्या जाळ्यातून सुटका होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा