नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2021: वेगाने वाढणाऱ्या लक्झरी इलेक्ट्रिक व्हेइकल स्पेस (लक्झरी ईव्ही) मध्ये आपला वाटा वाढवण्यासाठी, BMW ने सोमवारी आपली फ्लॅगशिप SUV लॉन्च केली. BMW iX इलेक्ट्रिक SUV ची एक्स-शोरूम किंमत 1.15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
या गाड्यांची टक्कर होईल
कंपनीने या लक्झरी इलेक्ट्रिक SUV (E SUV) चे बुकिंग सुरु केले आहे. तिची डिलिव्हरी पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होईल. BMW ची लक्झरी इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज EQC, Jaguar i-Space आणि Audi E-Tron शी स्पर्धा करेल.
तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला
या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ती बनवताना जीवाश्म इंधनाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. याशिवाय कंपनीने ही कार तयार करताना रेअर अर्थ मटेरियलचा वापर केलेला नाही. ते बनवताना प्लॅस्टिकपासून लेदरपर्यंत रिसायकलिंग करून तयार केलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
कंपनीने हे उत्तम फिचर्स दिले आहेत
BMW ने या इलेक्ट्रिक SUV मध्ये फ्रेम-लेस विंडो, बटण-ऑपरेटेड इलेक्ट्रिक डोअर ओपनर्स आणि सॉफ्ट क्लोज फंक्शन यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. दरवाजाचे हँडल बॉडी मध्येच इंटीग्रेट केले आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीने यात 14.9 इंच इंफोटेनमेंट आणि 12.3 इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देखील दिला आहे. कंपनीने यामध्ये गोल स्टिअरिंगऐवजी हेक्सागोनल स्टिअरिंग व्हील दिले आहे.
अर्ध्या तासात 80 टक्के चार्ज होईल
या कारमध्ये दोन हाय व्होल्टेज बॅटरी आहेत, ज्यांची एकूण क्षमता 76.6 kWh आहे. कंपनीचा दावा आहे की ही SUV एकदा फुल चार्ज केल्यानंतर 425 किमी पर्यंत धावू शकते. चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर, 11 kW AC चार्जर पूर्ण चार्ज होण्यासाठी सात तास लागतात. तर 50 kW DC आणि 150 kW DC चार्जरसह ते अनुक्रमे 73 मिनिटे आणि 31 मिनिटांत 80 टक्के चार्ज करणे शक्य आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे