मुंबई, १४ जुलै २०२३ : आता जगातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने, त्यांची इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये सादर केली आहे. कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर CE 02 जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
आपल्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्यासाठी bmw कंपनीने CE 02 स्कूटर अमेरिका बाजारपेठेत आणली आहे. लॉन्च झाल्यापासून या स्कूटर ची चांगलीच चर्चा रंगली आहे, याचे कारण म्हणजे किंमत. कंपनीने ही स्कूटर US$ 7599 म्हणजेच सुरुवातीची किंमत ६.३ लाख रूपये ठेवली आहे. नेहमीप्रमाणेच, BMW ने लूकवर खूप लक्ष दिले असुन अतिशय आकर्षक रचना देण्यात आली आहे. सिटी राईडवर लक्ष ठेऊन या स्कूटरची रेंज केवळ ४५ किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच स्कूटरला सिंगल आणि डबल बॅटरी पॅकचा पर्याय देण्यात आला आहे, कारण तुम्ही त्याची रेंज दुप्पट करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल.
स्कूटर च्या फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास स्कूटरची रचना अतिशय आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्कूटर मुख्यतः शहरी प्रवासासाठी बनविली आहे. स्कूटरमध्ये फ्लॅश, सर्फ आणि फ्लो राइडिंग मोड उपलब्ध आहेत. स्कूटर व्हीलस १४-इंच डिस्क ब्रेक, ABS, LED हेडलाइट्स, USD फ्रंट फोर्क्स, सिंगल सीट, 3.5-इंच TFT स्क्रीन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
पॉवर बॅटरी आणि इंजिन
कंपनीने या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सिंगल आणि डबल बॅटरी असे दोन पर्याय दिले आहेत. एका बॅटरीसह, या स्कूटरला ४५ किमी प्रतितास इतका वेग मिळतो. विशेष बाब म्हणजे युरोपातील अनेक देशांमध्ये CE 02 सिंगल बॅटरी व्हेरिएंट चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज लागत नाही. स्कूटरच्या डबल बॅटरी व्हेरिएंटची रेंज ९० किमी आहे आणि तिचा टॉप स्पीड ९५ किमी प्रतितास आहे. यातील बॅटरीमधून स्कूटरला १६ हॉर्स पॉवर मिळते. स्कूटरची डबल बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे पाच तास लागतात, तर सिंगल बॅटरी तीन तासांत चार्ज होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे