बिहार, १४ सप्टेंबर २०२३ : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बागमती नदीत आज सकाळी ३० मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. आत्तापर्यंत वीस मुलांना वाचविण्यात आले. अन्य दहा बेपत्ता मुलांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागमती नदीत आज सकाळी तीस मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी तात्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आलीय. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत वीस मुलांना पाण्यातून वाचविण्यात यश आले आहे. तर अजूनही दहा मुलांचा शोध सुरू आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर