बोधी फाऊंडेशनचा ‘उज्वल भविष्य’ सामाजिक बांधिलकी जोपासणारा अभिनव उपक्रम

3

छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च २०२३: शहरातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले भावसिंगपुरा शाळेतील वंचित दुर्बल घटकांतील ५० मुला मुलींना कामगार व आरोग्य विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय किटचं नुकतंच वाटप करण्यात आलं.

यावेळी अजंता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण चाबुकस्वार, दैनिक लोकमतचे शांतीलाल गायकवाड, दैनिक सकाळचे अनिलकुमार जमदाडे, शाळेचे मुख्यध्यापक बी.टी.भामरे, एनजीओचे अध्यक्ष रामदास वाघमारे, मीरा वाघमारे, देविदास बुधवंत, ऋत्विक वाघमारे यांच्या हस्ते शैक्षणिक कीटचं वाटप या वेळी करण्यात आलं.

किट मध्ये एकूण बारा साहित्यांचा समावेश:-

या शैक्षणिक किटमध्ये खाऊ, एनजीओची बॅग, पॅड, कंपास बॉक्स, चित्रकलेची वही, रंगपेटी, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, पट्टी पेन्सिल, वह्या, एक पुस्तक असे एकूण बारा साहित्याचा समावेश आहे.

‘उज्वल भविष्य’ हा उपक्रम बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जवळपास आठ हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शालेय किटचं वाटप करण्यात आलेलं आहे. फाऊंडेशनच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जोपासणारा अभिनव उपक्रम राबविण्यात येतोय. मागील आठ वर्षापासून वंचित दुर्बल घटकांतील मुला मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देण्यात येत असतात. पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना ‘उज्वल भविष्य’ या उपक्रमांतर्गत शैक्षणिक मदतीबरोबरच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही तसेच पुढील भविष्य उज्वल करण्यासाठी फाऊंडेशन नेहमी मदत करत असते. वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून भरकटला गेलाय. अशा या मुलांच्या ‘उज्वल भविष्यासाठी’ बोधी फाऊंडेशन पुढाकार घेत आहे, ही बाब ‘जीनियस’ आहे असे उदगार कामगार व आरोग्य विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांनी काढले.

न्युज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा