गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी पेचात!

दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी पेचात!

पुणे जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांकडून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप ‘प्रहार दिव्यांग क्रांती संघटने’ने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने ससून रुग्णालयाला पत्र पाठवले होते, मात्र यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार, प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणालाच त्याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हा आदेश नियमबाह्य असल्याचा आक्षेप संघटनेने घेतला आहे.

या चौकशीसाठी ससून रुग्णालय आणि जे.जे. रुग्णालय यांच्यातही समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे बनावट दिव्यांग शिक्षकांच्या चौकशीचे काम थांबले आहे. ‘प्रहार’ने या प्रकरणी संबंधित रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणाकडे शासनाचे लक्ष लागून आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version