फलटण, सातारा १८ ऑक्टोंबर,२०२३ : फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयू साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रतिपदन झाला आहे. चालू हंगामाचे गणित यशस्वी होण्यासाठी शरयु साखर कारखान्याने, चालू वर्षी प्रतीटना प्रमाणे साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला असून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहें.
फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयु साखर कारखान्याचा ९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी संचालक श्री अविनाश भापकर यांनी सपत्निक होम हवन व नवग्रह पूजा केली. चालू वर्षीच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून यंत्रणा उभी केली आहे. त्याचबरोबर आवश्यक तोडणी यंत्रणेचे करार करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात मंत्री समितीची बैठक होणार असून गळीत हंगाम तारीख जाहीर होताच गळीत हंगाम चालू करण्यात येणार आहे.
शरयुने याही वर्षी तालुक्यात उच्चतम ऊस दराची परंपरा कायम राखली असून शंभर टक्के एफ आर पी पेक्षा अधिक रक्कम ऊस पुरवठादार शेकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा केली आहे. चालू वर्षी ऊसाचे क्षेत्र अत्यल्प असल्याने उसाच्या बाबतीत अनेक अडचणी असून फलटण तालुक्याबरोबर शेजारी असणाऱ्या, कोरेगाव ,सातारा ,वाई, खंडाळा, भोर ,माळशिरस ,पुरंदर ,बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस शरयु कारखान्याला घालावा असे आवाहन श्री युगेंद्र दादा पवार यांनी केले आहें.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार