नवी दिल्ली, दि. ३० जून २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित केले. या संशोधनाच्या दरम्यान मोदींनी सरकार करत असलेल्या उपाययोजना विषयी माहिती दिली. कोविड -१९ च्या या साथीमुळे देशावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगत त्यांनी गरिबांना पुढील पाच महिन्यांसाठी मोफत अन्न तसेच पुढील समस्येचे निवारण करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे याविषयी माहिती दिली.
मोदींच्या या संशोधनानंतर विरोधकांनी मात्र लगेच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वात आधी राहुल गांधी यांनी एक ट्विट शेअर करत मोदींवर टीका केली. …ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा असा खोचक टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला.
यानंतर एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण संवर्धनामध्ये चीनचा विषय देखील काढला नाही. हे लक्षात घेऊन ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत असे म्हटले आहे की, “पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचे होतं पण ते बोलले चण्यावर. एका अर्थाने हे सुद्धा गरजेचं होते. कारण कोणताही विचार न करता लागू केलेल्या लॉकडाउनमुळे या देशातील अनेक गरिबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागले होते.” विशेष म्हणजे आपल्या संबोधना दरम्यान नरेंद्र मोदी यांनी सर्व सणांचा उल्लेख केला मात्र बकरी ईद विषयी ते काहीही बोलले नाही यावरून देखील ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
महत्त्वाचं म्हणजे काल केंद्र सरकारने ५९ चिनी ॲप वर बंदी घातली. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा एक मोठा निर्णय होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी आपल्या या संभाषणात याविषयी कोणताही उल्लेख केला नाही. मुळात त्यांनी चीन चा विषय काढला नाही त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी