उत्तराखंडमध्ये ५०० मीटर खोल दरीत बोलेरो जीप कोसळली, ९ जण ठार तर २ जखमी

पिथौरागढ, उत्तराखंड २२ जून २०२३: उत्तराखंड मधील पिथौरागढ येथे बोलेरो जीप दरीत कोसळून दुर्घटना घडलीय. प्रवाशांनी भरलेली ही बोलेरो ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ९ जण ठार झाले असून दोन जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी बागेश्वर जिल्ह्यातील सामा येथून जात होती. ही भरधाव जाणारी बोलेरो जीप दुर्घटनाग्रस्त होऊन ५०० मीटर खोल दरीत कोसळली. घटनेत ९ जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच, नाचनी पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंदन सिंह हे पोलिस टीमसह घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनाग्रस्तांसाठी तेजम रुग्णालयातून रुग्णवाहिका पाठवण्यात आली. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोलेरोतील सर्व जण होकरा मंदिरात पूजेसाठी जात होते. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथे रस्ते खूपच खराब अवस्थेत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा