बॉलिवूड अभिनेते आणि त्यांचे नागरिकत्व

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांबद्दल जाणून घ्यायला आपल्याला नेहमीच आवडत असते. आज आपण अशीच काहीशी माहिती जाणून घेणार आहोत…

कैटरिना कैफ : बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक कैटरिना ही एक आहे. कैटरिनाचा जन्म हा हाँगकाँग मध्ये झाला असून तिच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे. कैटरिनाची आई इंग्लंड मधील आहे तर वडील भारतीय आहेत.

इम्रान खान : सुपरस्टार अमीर खानचा भाचा इम्रान खान याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तो भारतामध्ये स्थायिक झाला.

अक्षय कुमार : अक्षयचा जन्म हा पंजाबमध्ये झाला असून तो दिल्लीमध्ये वाढला आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अक्षयकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यामुळे तो भारतामध्ये मतदान करू शकत नाही.

एमी जॅक्सन : एमी जॅक्सन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्याकडे इंग्लंडच नागरिकत्व आहे. तिने हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषीक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जॅकलीन फ़र्नांडीझ : जॅकलीन फ़र्नांडीझकडे श्रीलंकेच नागरिकत्व आहे. तिला अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालं नाही. बॉलीवूडमध्ये तिने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

कल्की कोचलीन : कल्की कोचलीन बॉलीवूडमधील आकर्षक अभिनेत्रीपैकी एक आहे. कल्कीला भारतीय नागरिकत्व मिळालं नाही. तिचा जन्म गोवा येथे झाला होता. तिच्याकडे फ्रेंच नागरिकत्व आहे.

आलीय भट : बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट यांची ती मुलगी आहे. आलियाचे वडील हे भारतीय आहेत तर आई ही इंग्लंड मधील आहे. आलियाकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे.

दीपिका पदुकोण : दीपिका पदुकोणकडे डेन्मार्कचे नागरिकत्व आहे. असे आरोप दीपिकावर सतत झाले. दीपिकाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करून त्याचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा