बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चोकसे यांचे निधन, दीड वर्षापासून कर्करोगाशी लढाई लढत होती

भोपाल,१४ जुलै २०२० : चित्रपटसृष्टीतून सतत एक वाईट बातमी समोर येत आहे. सुशांतसिंग राजपूतनंतर आता अ‍ॅक्ट्रेस दिव्या चोकसे हिचे निधन झाले . वास्तविक, दिव्या गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी लढाई लढत होती, तथापि, ती आपली लढाई हरली आणि रविवारी तीचा मृत्यू झाला. ती केवळ २८ वर्षांची होती. दिव्या बेडवर झोपून आहे असे निधन होण्यापूर्वी शेवटच्या पोस्टमध्ये दिव्यांका चोकसे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते.पण, या अभिनेत्रीच्या निधनाची बातमी तिच्या चुलत बहिणीने तिच्या फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केल्याने हे समजून आले .

दिव्या चोकसे यांची चुलत बहीण सौम्याने फेसबुकवर लिहिले की, “मला अत्यंत दुःखाने सांगावे लागेल की माझी चुलत बहीण दिव्या चोकसे आज कर्करोगामुळे अगदी लहान वयात मरण पावली आहे. तीने लंडन मधून अ‍ॅक्टिंगचा कोर्स केला होता. ती खूप चांगली मॉडेल होती, तीने चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केले होते, तिने गायनातही नाव कमावले होते आणि अभिनेत्री दिव्या चोकसे यांचा पहिला चित्रपट ‘अपना दिल तो आवारा’ वर्ष २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. आज ती आम्हाला सोडून गेली, तीच्या आत्मा शांती लाभो.

दिग्दर्शक मंजोय मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीने तिच्या गावी भोपाळमध्ये शेवटचा श्वास घेतला. मुखर्जी म्हणाले, ‘ती सुमारे दीड वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होती. तीची तब्येत बरी झाली होती, परंतू काही महिन्यांनंतर पुन्हा तीचा कर्करोग उद्भवला . यावेळी ती सावरू शकली नाही. आज सकाळी भोपाळमध्ये दिव्या चोकसेचे निधन झाले .

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा