बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन साकारणार गौरी सावंत यांची भूमिका

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२ : गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना डेट करत असल्यामुळे खूप चर्चा रंगल्या होत्या, आता पुन्हा एकदा सुष्मिता सेन चर्चेत आली आहे.

सुष्मिता सेन एक नवी कोरी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ‘आर्या’ वेब सीरिज च्या तुफान यशानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे.

सुष्मिता सेननं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमध्ये तिच्या वेब सीरिजमधील सुपर इंटेन्स लुक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, ती ‘ताली’ मध्ये श्री गौरी सावंत या अँक्टिविस्टची भूमिका साकारणार आहे. ‘ताली’ चा फर्स्ट लूक शेअर करत सुष्मिता ने कॅप्शन दिले ‘ताली’- बजाऊंगी नाही, बजवाऊगी ‘ मला एका अतिशय सुंदर व्यक्तीच्या जीवनावर आधारित भूमिका करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते अशा आशयाचे कॅप्शन सुष्मिताने दिले आहे.

सुष्मिता सेनने खूप वर्षानंतर ‘आर्या’ वेब सीरिज मधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं होतं. ‘आर्याचे’ दोन्ही भाग प्रेक्षकांना खुप आवडले होते. आता पुन्हा एकदा या वेब सिरीज च्या निमित्ताने लवकरच सुष्मिता सेन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा