गोल पोस्ट आरोग्य बॉलीवूड मेगास्टार सलमान खानला डेंग्यूची लागण

बॉलीवूड मेगास्टार सलमान खानला डेंग्यूची लागण

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड मेगास्टार सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. त्यांच्या लाडक्या हिरोला अर्थात सलमान खानला एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी मूवी चे आणि बिग बॉस १६ च शूटिंग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स नुसार सलमान खानला डेंगू झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून सलमान खानची तब्येत बिघडत चालली असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सलमान खानला डेंगू झाल्याची बातमी कळताच त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

त्यामुळेच काही दिवस लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस चे सूत्रसंचालन सलमान खान करताना दिसणार नाही. त्याच्या जागी निर्माता – दिग्दर्शक करण जोहर बिग बॉसच्या घराची सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. करण ने बिग बॉसच्या आधी बिग बॉस ओटीटी देखील होस्ट केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version