मुंबई, ९ ऑगस्ट २०२०: सध्याच्या वर्षात चित्रपट सृष्टीमधे अनेक विचित्र अशी ढवळाढवळ होत आहेत. अनेक दिग्गज या वर्षी जगाचा निरोप घेऊन गेले. तर काही अभिनेते अभिनेत्री हि त्यांच्या वैयक्तीक त्रासामुळे रुग्णालयात भर्ती होत आहेत. नुकतेच संपुर्ण बच्चन कुंटूब कोरोनावर मात करुन रुग्णालयातून घरी परतले. लगेच आणखी एक बातमी चित्रपट सृष्टी मधून आली आहे.
शनिवारी संध्याकाळी बाॅलिवूड चित्रपट सृष्टीचा खलनायक संजय दत्तला श्वासोच्छदवासाची आणि छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय दत्तला सायंकाळी ६ वाजता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, दत्तला अस्थिर ऑक्सिजनच्या पातळीवर दाखल करण्यात आले आणि जलद प्रतिजैविक चाचणीद्वारे कोरोनाव्हायरस रोगासाठी सीओव्हीआयडी -१९ तपासणी करण्यात आली, जी नकारात्मक झाली.
६१ वर्षीय संजय दत्तला आत्तापर्यंत नॉन-कोविड आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केले आहे. तर त्याच्या या बातमीने संपुर्ण चाहते त्यांच्या प्रकृती विषय देवाकडे प्रार्थना करत असल्याचे पहायला मिळाले. तर संजय दत्त यांनी स्वत: ट्विट केले, “माझी कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे आणि मी लवकरच उपचार घेऊन दोन दिवसात घरी जाईल” असे सांगितले.
तसेच, डॉक्टर उपचार करत असून काही चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, सध्या संजु बाबाची तब्येत स्थिर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































