बॉलिवूड ते हॉलिवूड यशस्वी अभिनेत्री ‘दीपिका पदुकोन’

भारतातील सर्वात लोकप्रिय आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींपैकी सर्वात यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोन ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ तिचा बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास.                                                                                                                  ५ जानेवारी १९८६ ला दीपिकाचा जन्म डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात झाला. दीपिका ही इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेअर प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाची आई उजाला या ट्रॅवल एजंट आहे.बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.
दीपिकाने बीए (सोशिओलॉजीध्ये) करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंगकडे वळली.
वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. टीन-एजमध्ये ती लिरिल आणि क्लोज-अपसह अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत झळकली.
२००६ मध्ये दीपिकाने कन्नड फिल्म ‘ऐश्वर्या’ द्वारे रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. या सिनेमानंतर दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. भारतामधील ती सध्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मानली जाते.
कॉकटेल, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्ट्रेस, गोलियों की रासलीला-रामलीला, हॅपी न्यू ईयर, पीकू, तमाशा, बाजीराव मस्तानी, पद्मावती या सिनेमांमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन दीपिका प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली.
बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर दीपिकाने २०१७ मध्ये हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. विन डीजलसोबत ‘XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूड सिनेमात दीपिका झळकली. दीपिका सध्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबंधनात अडकली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा