बाॅलिवूडला धक्का “या” माॅडेल ने घेतला जगाचा निरोप….

11

मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: बाॅलिवूड चित्रपट सृष्टीला एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. अभिनेता संजय दत्तची कॅन्सरची माहिती समोर आली आहे. ज्यामधे तो उपचार करण्यासाठी अमेरिकेत दाखल होणार आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत याची प्रकृती देखील गंभीर असून हैद्राबाद मध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अशातच बाॅलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे.

कॅन्सरमुळे बाॅलिवूडची प्रसिद्ध माॅडेल आणि सेलिब्रेटीचा मृत्यू झाला आहे. सिमर दुगल असे तिचे नाव आहे. तर फॅशनच्या जगातील तिचे स्थान अग्रस्थानी होते. सिमर माॅडेल आणि डिझायनर होती. तिच्या मृत्यूमु़ळे बाॅलिवूडवर शोककळा पसरली असून श्वेता बच्चन पासून ते मलायका आरोरा यांनी यावर दुःख व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: