मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा; जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

जामनगर, १० जानेवारी २०२३ : मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या फ्लाईटमध्ये २०० पेक्षा जास्त प्रवाशी होते. फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची माहितीमुळे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. दरम्यान सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा एटीसीला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटला गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले. फ्लाइटमधील सर्व २४४ प्रवाशांना रात्री ९.४९ च्या सुमारास सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले. घटनास्थास्थळी स्थानिक पोलिसांसह रुग्णवाहिका आणि बॉब्मशोधक पथक दाखल झाले असून सध्या विमानाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.

जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांनी सांगितले की, सुरक्षा यंत्रणांनी विमानतळाला नऊ तास घेराव घातला आहे. विमान आयसोलेशन बेमध्ये आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तसेच गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सुरक्षा कडक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा