राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

मुंबई, १३ जुलै २०२३: मिळालेल्या वृत्तानुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागितला होता. मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागितला होता आणि त्यांची याचिका पुढील आदेशासाठी राखून ठेवली होती.

गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये या राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबातील मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून मलिक हे अवैध मालमत्तेवर अतिक्रमण करत आहे, असा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने यापूर्वीही नवाब मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने सोमवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर आरोपांचा मसुदा दाखल केला. त्यानंतर तुरुंगात असलेल्या नवाब मलिक व्यतिरिक्त या प्रकरणातील अन्य तीन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आणि या प्रकरणाची सुनावणी २४ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा