मुंबई उच्च न्यायालयाने फेसबुकला ठोठावला २५ हजार रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण..?

मुंबई, १७ सप्टेंबर २०२२: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेसबुकला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. कंपनीला हे पैसे एका व्यक्तीला द्यायचे आहेत, कारण फेसबुकने बनावट जाहिरातीद्वारे त्या व्यक्तीची फसवणूक केलीय. प्रत्यक्षात त्रिभुवन भोंगाडे नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर बुटाची जाहिरात पाहिली होती. Nike शूज ५९९ रुपयांना मिळणार असल्याचे सांगण्यात आलं होतं.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

ते शूज त्या व्यक्तीने मारिया स्टुडिओ नावाच्या कंपनीकडून खरेदी केले होते. मात्र ऑनलाइन पेमेंट करूनही शूज वितरित केले नाहीत. कंपनीला फोन केला असता ७५६८ रुपयांचं आणखी नुकसान झालं. अशा स्थितीत त्रिभुवन भोंगाडे यांनी फिर्याद दिल्यानं प्रकरण न्यायालयात पोहोचलं. सर्वप्रथम, जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने फेसबुकला या प्रकरणात मानसिक छळ केल्याबद्दल ५९९ रुपये आणि २५,००० रुपये परतावा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, फेसबुकने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. यात फेसबुकने असं म्हटलं की, कारवाई करायचीच असेल तर त्या कंपनीवर करावी ज्या कंपनीने त्या व्यक्तीची फसवणूक केलीय.

फेसबुकचा युक्तिवाद काय होता?

व्यवहार प्रकरणात फेसबुकची कोणतीही भूमिका नाही, त्यामुळंच अशा सर्व प्रकरणांमध्ये त्यांना इम्युनिटी मिळते यावरही भर देण्यात आलाय. तक्रारदार भोंगाडे यांच्याकडून त्यांना कोणतेही पैसे मिळालं नसल्याचंही स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. मात्र, सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचा निर्णय कायम ठेवलाय. फेसबुकला तक्रारदाराला २५,५९९ रुपये द्यावे लागतील, त्यापैकी ५९९ पैसे व्यक्तीने शूज खरेदीसाठी खर्च केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा