गरीब विद्यार्थ्यांसाठी बुक बँक

बारामती, दि. १९ जून २०२०: सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती असल्याने नागरिकांच्या हाताला काम नाही अनेक ठिकाणी कामगारांना पगार नाहीत अशा परिस्थितीमध्ये खाण्याची भ्रांत असताना शाळांनी ऑनलाईन क्लास सुरू केल्याने इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तक खरेदी करणे फार जिकिरीचे होते मात्र यावर उपाय म्ह्णून सहारा फाउंडेशनने मोफत पुस्तक संकल्पना राबवली याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

बारामती शहरात सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सहारा फाऊंडेशनचे अध्यक्ष-परवेज हाजीकमरुद्दीन सय्यद यांच्या संकल्पनेतून सहारा फाउंडेशन या संघटनेने नागरिकांना आवाहन केल्यावर मोफत पुस्तक या संकल्पनेला प्रतिसाद देत समाजातील अनेक लोकांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक व्यक्तींनी त्यांच्याकडील एस एस सी , सी बी एस सी ची जुनी पुस्तके संघटनेकडे जमा केली त्यापुस्तकाना व्यवस्थित करून त्यांना कव्हर घालून त्याचे सेट करण्यात आले. ही जमा झालेली पुस्तके गरजु १ ते १० च्या ३७ विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी पालकांनी सध्याचे कोरोना संसर्गामुळे बेरोजगारी व हाताला काम नसल्याने तसेच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असक्याने शिक्षणाचा मोठा खर्च आहे. सध्या पैशाची मोठी चणचण असताना सहारा फाउंडेशनने पुस्तके दिल्याने मोठा आधार आला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी नगरअध्यक्षा पोर्णिमा तावरे यांच्याकडे जमिरर्भाई इनामदार यांनी त्यांच्या कडील पुस्तके जमा केली, तसेच सहारा फाऊंडेशन च्या वतीने उप-नगरअध्यक्षा तरन्नूम सय्यद यांच्या कार्यालयास अजीत दादा पवार यांचे कॅनव्हास पेंटिंग भेट देण्यात आले.

या प्रसंगी पत्रकार तैनुर शेख, मुस्लीम बॅंकेचें संचालक अल्ताफभाई सय्यद, शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढे, सहारा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष जयेंद्र ढवाण पाटिल, खंडोबा प्रतीषठाणचे अमित शिवरकर, आकाश कळे, गिरिश लोणकर, किरण बरवकर , विर्सेन बनकर, तब्रेज सय्यद, आकाश राऊत,असिफ शेख़ उपस्थीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा