पंजाब, २९ नोव्हेंबर २०२२ :पाकिस्तानातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या एका ड्रोनवर गोळीबार करुन ते पाडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. विशेष म्हणजे यावेळी ड्रोन पाडणाऱ्या बीएसएफच्या २ महिला जवान आहेत.
अमृतसरच्या चहरपूर गावात सोमवारी रात्री हे ड्रोन पाडण्यात आले. यावेळी बीएसएफच्या महिला कॉन्स्टेबल प्रीती आणि भाग्यश्री या गस्तीवर होत्या. ड्रोनचा आवाज ऐकून दोघीही सावध झाल्या आणि ड्रोनवर गोळीबार करून ते निकामी केले. दरम्यान, या ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्यात येत असल्याचा संशय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- महिला जवानांचा होणार सन्मान
प्रीती आणि भाग्यश्री या दोन्ही महिला जवानांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे बीएसएफच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ड्रोन पाडण्यात महिला जवानांना यश आल्याची ही पहिलीच घटना आहे.
न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे