बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक..

इंदापूर, २४ ऑक्टोबर २०२० :बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे.
भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार अकोले येथील गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर वरील आरोपी मारुती सुझुकी ( कार नं एम एच ४२ ए एस ०००८) मधून एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल), ४ जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. यावरून भिगवण पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपी व त्यांच्या कडील एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे ५ लाख ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला‌. तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला देखील सापळा रचून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, पोलीस नाईक गोरख पवार, इन्कलाब पठाण यांनी केली.

पुणे जिल्ह्यात आज पर्यंतची भिगवण पोलिसांनी केलेली अग्निशस्त्राची कारवाई ही खुप मोठी आहे. आतापर्यंत भिगवण पोलिसांनी सतरा अग्निशस्त्र जप्त केलेली आहेत .

प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा