माणुसकी विरुद्ध खोके सरकार – आदित्य ठाकरे

मुंबई, १४ ऑक्टोंबर २०२२ : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. आज ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारचा खोके सरकार म्हणून उल्लेख केलाय.

आज प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. अशावेळी समोरुन कुणीही लढत नसतं. परंतु खोके सरकारने एका महिलेला सतावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचं काळं मन समोर आलेलं आहे. त्यामुळे आता माणुसकी विरुद्ध खोके सरकार, अशी लढाई सुरु झाली आहे, अशा भावना आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवल्या. तसेच आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निश्चित विजय होईल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे

ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे गटाचे नेते अंधेरीमध्ये दाखल झालेले आहेत. दरम्यान, आज पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला. त्यासाठी लटकेंना मुंबई हायकोर्टात जावं लागलं होतं. शेवटी कोर्टाने पालिकेला फटकारल्यानंतर लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान दुसरीकडे शिंदे गट, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देखील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे. तर या निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा करण्यात येत असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा