नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२०: चीनी उत्पादनावरील बायकोट मोहीम असफल होताना दिसतेय. या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की लोक आता चिनी स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. कंपनीच्या दाव्यानंच याकडं लक्ष वेधलंय.
चीनी स्मार्टफोन शाओमीचा सहयोगी ब्रांड पोको आहे. पोको एम २ ची १५ सप्टेंबर रोजी प्रथम विक्री होती. एका दिवसात १.३० लाख स्मार्टफोन विकले गेले असल्याचा दावा कंपनीनं केलाय.
पोको एम २ ची प्रारंभिक किंमत १०,९९९ रुपये आहे आणि या स्मार्टफोनची बॅटरी ५,००० एमएएच आहे. अलीकडंच कंपनीनं हा फोन भारतात लॉन्च केला होता आणि १५ सप्टेंबर रोजी प्रथम विक्री झाली.
पोको एम २ मध्ये दोन प्रकार आहेत – ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज. टॉप मॉडेलची किंमत १२,४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये काळ्या, निळ्या आणि लाल रंगाचे तीन मॉडेल आहेत.
पोको एम २ स्पेसिफिकेशन्स आणि फ़ीचर्स
पोको एम २ मध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे आणि यात वॉटर ड्रॉप स्टाईल नॉच आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलीओ जी ८० प्रोसेसर आहे.
पोको एम २ मध्ये मागील चार कॅमेरे आहेत. प्राथमिक कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा, दुसरा ८ मेगापिक्सेलचा, तिसरा ५ मेगापिक्सेलचा आणि चौथा २ मेगापिक्सलचा आहे.
पोको एम २ मध्ये ५००० एमएचची बॅटरी आहे आणि १८ वॉट् फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी हेडफोन जॅक, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि ब्लूटूथ, वायफाय सारख्या मानक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे