ब्रह्मांडच्या गूढ रहस्य शोधणारा दूत ” स्टीफन हॉकिंग”

माणूस आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर काय करू शकतो. याची अनेक उदाहरणे आपल्या भारत देशात पहायला मिळतात. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे स्टीफन हॉकिंग. वयाच्या २१व्या वर्षी या माणसाला “ए एल एस” या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य आयुष्य खुर्चीवर बसून काढावं लागल. परंतु त्या अपंगत्वावर मात करत स्टीफन यांनी ब्रह्मांडामधल्या अनेक गूढ रहस्याचा शोध घेतला. आणि तो जगासमोर मांडला. आज अशाच जग जिंकणाऱ्या अवलियाचा आज वाढदिवस.

स्टीफन होस्टिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ मध्ये झाला. स्टीफन यांनी ब्रह्मांडाच्या उत्त्पतीविषयी अनेक महत्वपूर्ण सिद्धांत मांडले आहेत. स्टीफन हॉकिंग हे शाळेत असताना मात्र फारसे हुशार नव्हते. मात्र महाविद्यालयात त्या काळी ठराविक पद्धतीचे कपडे घालण्याची प्रथा होती, पण, स्टीफन यांना साचेबद्ध आयुष्य जगणं पसंत नव्हतं ते नेहमीच रंगीबेरंगी कपडे घालून महाविद्यालयात यायचे.
शाळेत हॉकिंगला ‘आइनस्टाइन’ असं ओळखलं जात असलं तरी काही संदर्भानुसार हॉकिंग यांचे शाळेतील गुण मात्र एका सरासरी विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षाही कमी होते.
‘प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स’ हा त्यांचा प्रबंध गेल्यावर्षी केंब्रिजनं ऑनलाइन प्रसिद्ध केला होता. हा प्रबंध इतका हिट ठरला की जगभरातील लाखो लोकांनी प्रकाशित होताच तो डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला आणि केंब्रिजची वेबसाईट अक्षरश: क्रॅश झाली होती.
शाळेत असताना आपल्या काही वर्गमित्रांच्या मदतीनं त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून चक्क कॉम्प्युटर तयार केला होता. स्टीफन यांना जेव्हा एका मुलाखतीत विश्वातील सर्वात गुढ गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला होता तेव्हा ‘स्त्री’ ही जगातील सर्वात गूढ गोष्ट असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं.
२००७ साली स्टीफन यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. त्यावेळी कित्येक वर्षींनी प्रथमच ते आपल्या व्हिलचेअरवरून उठले होते. एलियन्स असू शकतात असं मानणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी स्टीफन एक होते. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
आज ते आपल्यात नाहीत परंतु त्यांनी केलेलं संशोधन मानवाला पुढील अनेक वर्षे उपयोगी पडेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा